Pune.Media

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेच्या अंमलबजावणीमुळे कोरोनाबाधित रुग्णसंख्या झाली कमी


पुणे दि.15- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संक्रमितांची संख्या कमी करण्यासाठी 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ यवत ता. दौंड येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत झाला. माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोनाबाधित रुग्ण कमी झाले असल्याचे सांगतानाच कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी सर्वांनी आरोग्य पथकाला सहकार्य करावे, सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व मोहिमेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

 

दौंड तालुक्यातील यवत येथे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी उपविभागीय प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, तहसीलदार संजय पाटील,जिल्हा परिषद सदस्य् गणेश कदम, गटविकास अधिकारी अंतिक्य येळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे, वैद्यकीय अधीक्षक शशिकांत इरवाडकर, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पंचायत समिती सभापती आशा शितोळे, उपसभापती नितिन दोरगे, गटविकास अधिकारी राजाराम, शेंडगे, तलाठी कैलास भाटे आदीसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्यामुळे कोरोना संसर्ग कमी करण्यात यश आले आहे. प्रत्येक कुटुंबाने आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याने या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.  ग्रामीण भागातील नागरिकांची घरोघरी जाऊन कोविड रुग्णांचा शोध घेणे, त्यांना तातडीने उपचार उपलब्ध करुन देऊन मृत्यूदर कमी करणे यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम जिल्हाभर राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सहभागी होवून प्रत्येकाने आपले कुटुंब सुरक्षित ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाभर पथकांचा दौरा

पुणे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी चार पथकांची स्थापना करण्यात आली. या पथकाने 14 ऑक्टोबर 2020 रोजी तालुकानिहाय आढावा घेतला, यामध्ये स्वत: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखही सहभागी झाले होते. पथक क्र. 1 मध्ये जिल्हाधिकारी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, संदीप कोहिनकर यांचा समावेश होता. या पथकाने दौंड, इंदापूर, बारामती, व पुरंदर तालुक्यातील माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम कोविड व्यवस्थापन, डाटा रिकन्सीलेशन, डाटा अपडेशन, गंभीर रुग्णांची व्यवस्था, लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनावर केलेली कार्यवाही याबाबतचा आढावा घेतला. पथक क्र. 2 मध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  महादेव घुले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके, यांनी भोर, वेल्हा, मुळशी व मावळ तालुक्याचा दौरा करून आढावा घेतला. पथक क्र. 3 मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे, निवासी वैद्यकीय अधिकारी संतोष देशपांडे यांनी खेड, आंबेगाव, जुन्नर , शिरूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करून आढावा घेतला. पथक क्र. 4 मध्ये प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मिलींद टोणपे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सोनवणे, यांनी हवेली तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करून आढावा घेतला.



Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their original owners.

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

Comments
Loading...
Do NOT follow this link or you will be banned from the site!