Pune.Media

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख


लातूर, दि.१८: लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि खासदार शरद पवार  यांच्यासह पाहणी केली. उमरगा तालुक्यातील कवठा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना राज्य शासन आपल्या पाठीशी आहे काळजी करू नका असा धीर दिला.

 

यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे,माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,माजी मंत्री बसवराज पाटील,आमदार ज्ञानराज चौगुले,आमदार बाबासाहेब पाटील, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत,पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन,किरण रवींद्र गायकवाड,मकरंद सावे,कृषी, महसूल विभागाचे संबंधित अधिकारी सोबत होते.



Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their original owners.

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

Leave A Reply

Your email address will not be published.

Do NOT follow this link or you will be banned from the site!